यायला लागतय

जगभरात सर्वात जास्त लोकप्रिय असलेले CMS म्हणजे WordPress आणि त्याचा वापर करणारी मंडळी म्हणजे WordPress Community चा सर्वात मोठा सण WordCamp पुणे परत आपल्या स्वागतास सज्ज आहे. WordCamp पुणे २०१५ च्या भरमसाठ यशा नंतर संजोयक Pune WordPress Knowledge Exchange (Wordex) यांनी या वेळी मागचे अनुभव व आलेल्या लोकांच्या प्रतिक्रिया लक्षात ठेवत WordCamp पुणे २०१७ भव्य, दिव्य आणि अविस्मरणीय करण्याचे योजिले आहे.

सर्व सहभागींना उपयोगी अश्या कार्यक्रमाचे नियोजन व प्रयत्न केले गेले आहेत. पंधरा जानेवारी रोजी हा दिवस भराचा कार्यक्रम नेस वाडिया वाणिज्य महाविद्यालय येथे संपन्न होणार आहे. दिवसभरात चार वेगवेगळ्या Tracks मध्ये एकूण २१ सत्र यापैकी १९ Talks व २ Panel Discussions अशी या कार्यक्रमाची रूपरेषा आहे. विशेष म्हणजे या वेळी सुध्या आमच्या कडे ५ सत्र मराठी किंवा अर्ध-मराठीत होणार आहेत.

या मराठी सत्राची माहीती साठी : ~

प्रत्येक सहभागीला आमच्या व प्रायोजकां कडून खूप सारा swag ही मिळणार आहे ज्यात T-shirt, sipper, badges आदी चा समावेश आहे. इतकच नव्हे तर मागच्या वेळेची परंपरा कायम ठेवत After-Party सुद्धा आयोजित करण्यात आली आहे…

२०१७ च्या संपुर्ण जगभरातील पहिल्याच WordCamp ला नक्कीच यायला लागतय !

Author: unsharpme

I am a WordPress Enthusiast, user, developer and more... Own a small web development firm based out of Kolhapur, an upcoming town in south maharashtra.

WordCamp Pune is over. Check out the next edition!