चर्चा तर होणारच…

जगभरात सर्वात जास्त लोकप्रिय असलेले CMS म्हणजे WordPress आणि त्याचा वापर करणारी मंडळी म्हणजे WordPress Community चा सर्वात मोठा सण WordCamp यंदा पुण्यात साजरा होत आहे.

WordCamp पुणे २०१५ च्या निमित्ताने संजोयक Pune WordPress Knowledge Exchange (Wordex) यांनी सर्व सहभागींना एक अत्यंत सुखद, उपयोगी आणि अविस्मरणीय अनुभव देण्यासाठी खूप नियोजन व काम केले आहे. सहा सप्टेंबर रोजी हा दिवस भराचा कार्यक्रम Modern College of Arts, Science and Commerce येथे संपन्न होणार आहे.

Pimpari_Gavali_Gramsabha

दिवसभरात चार वेगवेगळ्या Tracks मध्ये एकूण ३२ सत्र पैकी २० Talks, ६ Workshops, ३ Panel Discussions, २ Q&As व १ Critique अशी रूपरेषा आहे. विशेष म्हणजे यात ६ सत्र मराठी किंवा अर्ध-मराठीत तर १० सत्र हिंदी किंवा अर्ध-हिंदीत होणार आहेत. ६ देशातली एकूण ४० Speakers या सत्रात आपलं ज्ञान व मते मांडणार आहेत. २ Fun Lounge (WordPress Lounge व Word Lounge) सुद्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत. शिवाय २ Fun Contests (Photography Contest व  Selfie Hunt) ही आहेत. पूर्ण दिवसात networking साठी ३ मोठ्या breaks व ११ छोट्या breaks आहेत व प्रयोगात्मक Buddy Program पण असणार आहे. या वेळी सर्वांना नक्कीच नवीन मित्र व सहयोगी भेटावेत या साठी आम्ही  प्रयत्नशील आहोत. त्यामुळे पूर्ण दिवस शिकण्या बरोबर मज्जा ही सुरूच राहणार यात काही वाद नाही.

WordPress Community ला कायम समर्थन देणारे २१ दिलदार sponsors नी ‘ होऊ दे खर्च ‘ म्हणत आर्थिक सहभाग नोंदवला आहे. प्रत्येक सहभागीला आमच्या व प्रायोजकां कडून खूप सारा swag ही मिळणार आहे ज्यात T-shirt, sipper, mug आदी चा समावेश आहे. इतकच नव्हे तर भारतात होणाऱ्या WordCamps मध्ये पहिल्यांदा After-Party सुद्धा आयोजित करण्यात आली आहे…

हाउस फुल झालेल्या या event बदल हे सगळ वाचून आपल्याला कळून चुकल असेल की WordCamp पुणे २०१५ ची
“चर्चा तर होणारच… !”


Pimpari Gavali Gramsabha” by Yogeshmanage09Own work. Licensed under CC BY-SA 3.0 via Commons

One thought on “चर्चा तर होणारच…”

Comments are closed.

WordCamp Pune 2015 is over. Check out the next edition!